साकेगाव येथे झुडपांमुळे रस्ता झाला खूपच अरुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:19 IST2020-10-09T19:19:47+5:302020-10-09T19:19:53+5:30

दखल घेण्याची मागणी

The road at Sakegaon was very narrow due to bushes | साकेगाव येथे झुडपांमुळे रस्ता झाला खूपच अरुंद

साकेगाव येथे झुडपांमुळे रस्ता झाला खूपच अरुंद


भुसावळ : साकेगाव येथे नवीन गणपती नगर व सरळ नवीन वस्ती मार्गावर दोन्ही बाजूने काटेरी झुडपांनी वेढा घातल्याने या नागरिकाना रस्त्याने चालणेही कठीण होऊन बसले आहे. दखल घेऊन हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.
बस स्टॅन्डवरून सरळ आंबेडकर मार्ग, शाळेकडे जाण्यासाठी हा रस्ता मुख्य झाला आहे. मात्र हनुमान मंदिरा लागून असलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडप्यांनी वेडा घातल्यामुळे या रस्त्याची अवस्था दाट वस्तीतील एखाद्या गल्ली सारखी झालेली आहे. यातच भर म्हणून रस्त्याच्या मधोमध खड्डा पडलेला आहे व त्या ठिकाणी नेहमी घाण पाणी साचलेले असते. रात्रीच्या वेळेस तर येथे अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे महिलांना येथून जाण्यास भीती वाटते. ग्रामपंचायत प्रशासनाने काटेरी झुडपांची छटाई करून मधोमध पडलेल्या खड्ड्यात कच टाकून डागडुजी करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The road at Sakegaon was very narrow due to bushes