सावखेड्याजवळ रस्त्याची झाली वाताहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:25+5:302021-09-09T04:21:25+5:30
नांदेड, ता. धरणगाव : सावखेडा-धावडे-नांदेड या पाच किमी लांबीच्या रस्त्यापैकी पाटापासून ते भिल्ल वस्तीच्या कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्याची पार दुर्दशा होऊन ...

सावखेड्याजवळ रस्त्याची झाली वाताहात
नांदेड, ता. धरणगाव : सावखेडा-धावडे-नांदेड या पाच किमी लांबीच्या रस्त्यापैकी पाटापासून ते भिल्ल वस्तीच्या कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्याची पार दुर्दशा होऊन वाताहात लागली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील खडी व डांबर उखडून गेलेले असल्याने ठिकठिकाणी लहान-मोठ्या जीवघेण्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावालगत तर रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडून रस्त्याची वाट लागलेली आहे. शिवाय रस्त्याला लागूनच शेणखतांचे उकीरडेदेखील आहेत.
गटारींचे पाणीदेखील सतत रस्त्यावर येत असल्याने चिखलामुळे वाहने घसरून अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. चिखलामुळे अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून किरकोळ अपघात झाले आहेत. दोन वाहने समोरासमोरून येताना या ठिकाणी खूपच कसरत करावी लागते. शनिवारी आदिवासी बांधवांसाठी खावटी किट वाहून नेणारी मालवाहू महाकार्गो बस याच ठिकाणी शेणखतांच्या उकीरड्यांमध्ये खोलवर रुतली होती.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायतीनेदेखील दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीसह दोन्ही बाजूंना गटारींची व्यवस्था करावी, अशी मागणी त्रस्त वाहनचालकांमधून केली जात आहे.