जळगाव ते चाळीसगाव आणि औरंगाबाद रस्त्यावर आहे भूसंपादनाची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:09+5:302021-04-06T04:16:09+5:30
जळगाव : जळगाव ते पाचोरा आणि पाचोरा ते चाळीसगाव या रस्त्याचे जवळपास १० टक्के काम हे भूसंपादन रखडल्याने अपूर्ण ...

जळगाव ते चाळीसगाव आणि औरंगाबाद रस्त्यावर आहे भूसंपादनाची अडचण
जळगाव : जळगाव ते पाचोरा आणि पाचोरा ते चाळीसगाव या रस्त्याचे जवळपास १० टक्के काम हे भूसंपादन रखडल्याने अपूर्ण आहे.त्यासाठी रामदेववाडी, बिलवाडी या गावांतील जमिनीसंदर्भात डिसेंबर महिन्यात जळगावच्या प्रांतअधिकाऱ्यांनी सूचनाही प्रसिद्ध केली होती. त्यासोबत औरंगाबाद रस्त्यावर गाडेगाव जवळील घाटातही जमीन संपादनाचे काम रखडले आहे. हे कामही अपूर्ण आहेत.
जळगाव ते पाचोरा या रस्त्यावर ९ किमीचे काम अपूर्ण आहे. हा रस्ता ५२ किमीचा आहे. त्याची किंमत २२८ आहे. शहराची हद्द संपल्यावर हा रस्ता सुरू होतो. पाचोरा ते ४० गाव ३ किमीचे अपूर्ण आहे. ४८ किमीचे अंतर आहे, तर पाचोरा ते चाळीसगाव या रस्त्यासाठी २१० कोटींचा रस्ता आहे. जळगाव ते पाचोरा रस्त्याचे काम जवळपास १० टक्के काम हे भूसंपादनामुळे रखडले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात जळगावच्या प्रांतअधिकाऱ्यांनी याबाबत नोटीसही प्रसिद्ध केली आहे. त्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.