अमळनेर : मुसळी, धरणगाव अमळनेर बेटावद रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यावरील सुमारे ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. यात म्हसले गावाजवळ असलेल्या गर्द वनराईतील काही झाडांवर कुºहाड पडणार असून अनेक वर्षांपासून वाटसरूंना गारवा देणारी ही झाडे वाचवावी अशी मागणी होत आहे.म्हसले येथील मराठी शाळेपासून ते भोणे फाट्यापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो झाडे लावली आहेत. यात सुबाभूळ, निंब, निलगिरी आणि काशीद जातीचे वृक्ष आहेत. सदर झाडे उंच व दाटीवाटीने वाढल्याने या ठिकाणी दिवसा देखील अंधार असतो. या ठिकाणी उन्हाळ्यात कमालीचा गारवा जाणवतो, त्यामुळे वाटसरू हमखास थांबतात. रात्री अंधारामुळे प्रवाशांना धडकी देखील भरते. सेल्फी पॉईन्ट म्हणून नावारूपाला आलेला हा पॉईन्ट वाचवा अशी आर्त हाक आता तरुणाई देऊ लागली आहे. ही झाडे कोणी लावली याबाबत माहिती नसली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि म्हसले येथील ग्रामस्थ यांनी ही झाडे जोपासली आहेत. अमळनेर धरणगाव जळगाव या ५५ किमीच्या मार्गावर दुतर्फा लावलेली अशी गर्द झाडी कुठेही नाहीत.राज्य मार्ग क्रमांक ^६, मुसळी फाटा धरणगाव अमळनेर, बेटावद या रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण १४ मीटरपर्यंत होणार आहे, त्यामुळे संपूर्ण मार्गावरील ३९९४ झाडे तोडावी असे सर्वेक्षण शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमळनेर विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून केवळ ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. त्यातील म्हसले गावाजवळील ५४ झाडे तोडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्ता नुतनीकरणात म्हसले येथील वनराईवर कुºहाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:51 IST
मुसळी, धरणगाव अमळनेर बेटावद रस्त्याचे काम सुरू असल्याने त्यावरील सुमारे ५६७ झाडे तोडली जाणार आहेत. यात म्हसले गावाजवळ असलेल्या गर्द वनराईतील काही झाडांवर कुºहाड पडणार असून अनेक वर्षांपासून वाटसरूंना गारवा देणारी ही झाडे वाचवावी अशी मागणी होत आहे.
रस्ता नुतनीकरणात म्हसले येथील वनराईवर कुºहाड
ठळक मुद्देएक किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी आहेत शेकडो झाडे ५४ झाडे तोडली जाणार असल्याचे सा.बां. विभागाचे म्हणणे.