चुंचाळे फाट्यावर भीम आर्मीतर्फे रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:20+5:302021-09-02T04:37:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चुंचाळे/यावल : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य मार्गावर चुंचाळे फाट्यावर १ रोजी सकाळी ११ वाजता भीम आर्मीतर्फे ...

चुंचाळे फाट्यावर भीम आर्मीतर्फे रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
चुंचाळे/यावल : बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य मार्गावर चुंचाळे फाट्यावर १ रोजी सकाळी ११ वाजता भीम आर्मीतर्फे चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या दुर्लक्षित रस्त्याची तत्काळ दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ या रस्त्यासाठी १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
येत्या काही दिवसात या रस्त्याच्या कामास सुरुवात होईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवींद्र पाटील यांनी दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
भीम आर्मी या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुपडू संदानशिव यांनी या मार्गाबद्दल पाठपुरावा केला व १ सप्टेंबर रोजी चुंचाळे फाट्यावर राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात भीम आर्मीचे राज्य प्रवक्ता रमाकांत तायडे, तालुकाध्यक्ष हेमराज तायडे, तालुका उपप्रमुख आकाश बिऱ्हाडे, सत्यवान तायडे, सचिन वानखेडे, भय्या तडवी, सचिन पारधे, पंकड डांबरे, चंदू पारधे यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. यामुळे अनेक वाहने ही राज्य मार्गावरील रस्त्याच्या दोन बाजूला थांबली होती. आंदोलनप्रसंगी पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला.