जळगावात रात्री ट्रकवर दगडफेक, दोन वाहनांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 02:39 IST2017-08-31T02:39:27+5:302017-08-31T02:39:39+5:30

Road accidents in Jalgaon, two vehicle damage | जळगावात रात्री ट्रकवर दगडफेक, दोन वाहनांचे नुकसान 

जळगावात रात्री ट्रकवर दगडफेक, दोन वाहनांचे नुकसान 

जळगाव, दि. 31 - शहरातील तांबापुरा भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी वाहनांवर दगडफेक केली. त्यात एक ट्रक आणि एका पिकअप वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. ही वाहने जैन इरिगेशन कंपनीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

शिरसोली नाक्याजवळील गल्लीतून ही दगडफेक झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. यात युपी 84 टी 4087 या क्रमांकाच्या ट्रकची समोरची काच पूर्णपणे फुटली तर एमएच 19 एस 8017 क्रमांकाच्या पीकअप गाडीचेही नुकसान झाले आहे. 

घटनास्थळी जैन इरिगेशनचे सुरक्षारक्षक दाखल झाले होते. त्यांनी पोलिस गस्ती पथकाला ही बाब कळविल्यावर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनचालकांकडून माहिती घेऊन चौकशीला सुरूवात केली आहे.

Web Title: Road accidents in Jalgaon, two vehicle damage

टॅग्स :Crimeगुन्हा