त्यानंतरही जेमतेम पाऊस पडला. मात्र, आतापर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस पडून शेतीचे नुकसान झाले. धरणे ओसंडून वाहत आहेत. परंतु धानोरा परिसरातील नदी, नाल्यांना एकदाही पूर आलेला नसल्याने ते कोरडे पडलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे आणि भविष्यात पाणी टंचाई जाणवणार आहे.
चिंचपाणी धरणात पाणी नाही
सातपुड्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी चिंचपाणी धरण लघुप्रकल्प बनविण्यात आला आहे. ते धरण जर पाण्याने भरले तर शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांची भूगर्भात मोठ्या प्रमाणात पाणीपातळी वाढते आणि पाणीटंचाईचे संकट येत नाही. परंतु यावर्षी सातपुड्यात अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने मुक्या जनावरांना पाणी पिण्यासाठीही साठा झालेला नाही. धरण न भरल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत. जोरदार पाऊस पडावा नदी, नाल्यांना पूर येऊन धरण भरावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.