जळगाव : भरधाव वेगाने आलेली रिक्षा विद्युत खांबावर धडकल्याने खांबावरील विद्युत तार तुटला व त्यात विजेचा धक्का लागून किर्ती अमोल राजापुरे (वय २८, रा.आशाबाबा नगर, जळगाव) ही महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ८.४५ वाजता शिव कॉलनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. या घटनेतील महिलेला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. रिक्षा चालक हा दारुच्या नशेत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अमोल राजापुरे व किर्ती राजापुरे हे दाम्पत्य जेवण केल्यानंतर फिरायले गेले असता रिक्षाने खांबाला धडक दिली. त्यात किर्ती राजापुरे यांच्या हातावर विजेची तार पडल्याने त्या जखमी झाल्या.या अपघातामुळे विद्युत तारा तुटल्या व रोहित्रावर स्फोट झाला, त्यामुळे आशाबाबा नगर, शिव कॉलनी या भागातील विद्युत पुरवठा बंद झाला होता. या अपघातातील रिक्षा रेल्वे रुळाजवळील खड्डयात पडली होती. विद्युत पोल वाकला आहे.
जळगावात महामार्गावर रिक्षाची वीज खांबाला धडक, महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:03 IST
विद्युत पुरवठा खंडित
जळगावात महामार्गावर रिक्षाची वीज खांबाला धडक, महिला जखमी
ठळक मुद्देरिक्षा चालक हा दारुच्या नशेत अपघातामुळे विद्युत तारा तुटल्या व रोहित्रावर स्फोट