प्रवाशांना सोडून घरी येताना रिक्षा उलटली; चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:13 IST2021-06-24T04:13:02+5:302021-06-24T04:13:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्रवाशांना पाळधी येथे सोडून पुन्हा जळगाव शहरात येत असतांना रिक्षा पलटी होवून त्यात ...

The rickshaw overturned on its way home leaving the passengers; Death of the driver | प्रवाशांना सोडून घरी येताना रिक्षा उलटली; चालकाचा मृत्यू

प्रवाशांना सोडून घरी येताना रिक्षा उलटली; चालकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : प्रवाशांना पाळधी येथे सोडून पुन्हा जळगाव शहरात येत असतांना रिक्षा पलटी होवून त्यात रिक्षाचालक सतीश सुरेश महाजन (वय ३५,रा.वैष्णवी पार्क, आहुजा नगर) याचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री १२.३० वाजता बांभोरीजवळील एसएसबीटी महाविद्यालयाजवळ झाला होता.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश सुरेश महाजन हा तरुण मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाळधी येथे प्रवाशांना सोडून आहुजा नगर येथे घरी परत येत होते. बांभोरी गावाजवळील एसएसीबीटी महाविद्यालयाजवळ महाजन याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले व रिक्षा पलटली. त्यात सतीश महाजन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरु असतांना बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. सतीश याच्या पश्चात आई रूख्माबाई, वडील सुरेश पंढरीनाथ महाजन, भाऊ किरण, रणजीत व विवाहित बहिण असा परिवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: The rickshaw overturned on its way home leaving the passengers; Death of the driver