रिक्षा सोडली अन् चोर चार चाके घेऊन पळाले
By विलास बारी | Updated: October 14, 2023 18:28 IST2023-10-14T18:28:08+5:302023-10-14T18:28:59+5:30
खडके चाळ व नामदेव नगरातील प्रकार

रिक्षा सोडली अन् चोर चार चाके घेऊन पळाले
विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : खडके चाळ आणि नामदेवनगर परिसरातील चार रिक्षांची चाके अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आली.
शिवाजीनगर परिसरातील खडके चाळ व नामदेवनगर परिसरात शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांची प्रत्येक दोन चाके काढून नेली. या घटनेत अफसर शेख सत्तार (२४), प्रमोद मांडोळे (३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे.
या घटनेत एका रिक्षाचालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारांपर्यंत नुकसान झाले आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसांना माहिती दिली. पोहेकॉ किशोर निकुंभ यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही तपासले. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.