Rickshaw drivers' march at Bhusawal | भुसावळ येथे रिक्षा चालकांचा मोर्चा
भुसावळ येथे रिक्षा चालकांचा मोर्चा


भुसावळ : आर.टी.ओ च्या त्रासाला कंटाळून भुसावळ तालुक्यातील रिक्षा चालक मालकांनी पी.आर.पी.चे प्रदेश पदाधिकारी जगन सोनवणे यांचा नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चा काढला.
स्कुलव्हॅन व रिक्षा चालकांचा हा मोर्चा भिमालया वरून काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने रिक्षा चालक मालक सहभागी झाले .
तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना वाहून नेणाऱ्या रिक्षा चालकांना शाळेचे पत्र तसेच शासकीय परवानगी घेणे गरजेचे आहे.ज्या रिक्षा चालकांकडे परमिट असूनही परवानगी नसल्यास त्यांना रिक्षेने विदयार्थ्यांना नेता येणार नाही. शाळेकडून परवानगी घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाचे १०० रुपये मोजावे लागणार आहे. तर आर.टी.ओ.कार्यालयाकडून परवानगी घेतल्यास ३९५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच रिक्षा चालकांना नवीन रिक्षा खरेदी करावी लागणार आहे. या सर्व त्रासाला कंटाळून साप्ताहिक महामोर्चा जुन्या नगरपालिकेवरून प्रांत कार्यलयावर नेला. प्रांत कार्यालयात दिलेल्या निवेदनात आर.टि.ओ.मेमो देणे बंद करा, वाहनांची कागदपत्र तसेच चाबी घेणे बंद करा आदी मागण्या केल्या. प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Rickshaw drivers' march at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.