नगरदेवळा येथे श्रीमंत बालाजी रथोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:58 IST2018-11-21T21:56:18+5:302018-11-21T21:58:16+5:30
धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक ठेवा असलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव उत्साहात पार पडला.

नगरदेवळा येथे श्रीमंत बालाजी रथोत्सव उत्साहात
नगरदेवळा ता.पाचोरा- धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक ठेवा असलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव उत्साहात पार पडला. सायंकाळी ५.३० वाजता नगरदेवळ्याच्या जहागिरदार घराण्याचे वंशज अर्जुनराजे पवार यांच्याहस्ते बालाजी महाराज संस्थानच्या प्रांगणात रथाचे पूजन व महाआरती करून गोविंदा$ गोपाळाच्या गजरात अग्नावती चौपाटीवरून रथोत्सवास सुरूवात झाली.
२०० वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव जातीय सलोख्याचेही प्रतिक म्हणून प्रसिद्ध आहे. बालाजी महाराज मंदीर व जामा मशिद एकाच भिंतीत संलग्न आहेत. रथोत्सव मिरवणुकीवर आरती नंतरचा पहिला पुष्पार्पण हा मुस्लीम समाज बांधवांतर्फे जामा मशिदीवरून करण्यात येतो. रथोत्सव मिरवणुकीतही रथ ओढण्यासाठी मुस्लीम मित्रमंडळाचे तरूण सहभागी होते. दिवाळीनंतर नंतर चौदाव्या दिवशी रथोत्सव येतो .यावर्षी ईद-ए-मिलाद व रथोत्सव एकाच दिवशी येण्याचा योग आल्याने ईदची मिरवणुकही सायंकाळी पाचची वेळ असताना रथोत्सवासाठी, दुपारी उत्साहात झाली. दोन्ही प्रार्थनास्थळांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.रात्री साडेदहा वाजता अग्नावती चौपाटीवर महाआरती होऊन, फटाक्यांच्या आतषबाजीत रथोत्सव संपन्न झाला.