पाचोरा येथे काँग्रेसच्या बैठकीत बुथ कमेटीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:16 IST2019-01-04T22:15:24+5:302019-01-04T22:16:43+5:30
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सक्त सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व काँग्रेस प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी पाचोरा येथील संपर्क दौऱ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत दिल्या.

पाचोरा येथे काँग्रेसच्या बैठकीत बुथ कमेटीचा आढावा
पाचोरा, जि.जळगाव : कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सक्त सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व काँग्रेस प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी पाचोरा येथील संपर्क दौऱ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत दिल्या.
पाचोरा-भडगाव तालुक्याची संयुक्त बैठक पाचोरा येथे झाली. यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, प्रा.शिवाजी पाटील, मुक्तार शाह, सचिन सोमवंशी, प्रताप पाटील, नंदू सोनार, कुसुम पाटील, दिगंबर पाटील, राजेंद्र महाजन, विठ्ठल गुंजाळ, शेख इस्माईल शेख फकिरा, भडगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, पद्मिनी तहसीलदार, अनिता पवार, शकील शेख, देवीदास महाजन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शक्ती अॅप जोडणे, यूपीए व एनडीए सरकारच्या कारभाराच्या तुलनात्मक कामगिरीचे आढावी दर्शविणारे फलक वाटप करण्यात आले. संपर्क अभियानाची रूपरेषा ठरविण्यात आली. बूथ कमेटी निश्चित करण्यात आल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.