जळगाव : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना ६ वर्षांचा कालावधी होवूनही शासनाकडून अद्यापपावेतो कोणताही शासननिर्णय निर्गमीत झालेला नाही. तथापी शासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही न केल्यास संघटनेच्या आंदोलनाची रुपरेषा निश्चीत करण्यात आलेली आहे. या आंदोलनाच्या ७ व्या टप्प्यानुसार जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपास सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध घोषणा देण्यात आल्या. राज्यातील तसेच जिल्हाभरातील सर्व महसूल कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.
महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 13:08 IST