वडिलांच्या अंत्ययात्रेत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा गोळीबार; एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 22:14 IST2019-05-11T22:10:32+5:302019-05-11T22:14:08+5:30
जळगाव जिल्ह्यातील पिंप्री येथील घटना

वडिलांच्या अंत्ययात्रेत सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा गोळीबार; एक ठार
एरंडोल, जि.जळगाव : धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे एका अंत्ययात्रेत झालेल्या वादातून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने तीन राऊंड फायर केले. त्यात पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा येथील एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील श्रावण बारकू मोहकार (वय-८५) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रे दरम्यान वाद झाले. त्यामुळे श्रावण मोहकार यांचे चिरंजिव व सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांनी आपल्याकडील पिस्तूलमधून गोळीबार केला. दोन वेळा गोळीबार केल्यानंतर तिसरी गोळी अडकली. या दरम्यान एक गोळी लागून अंत्ययात्रेत सहभागी झालेला पिंपळगाव हरेश्वर येथील इसम ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. मयताचे नाव समजू शकलेले नाही. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला जात आहे.