बुलेट घेण्यासाठी आलेले निवृत्त सहाय्यक फौजदार अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 13:56 IST2020-05-08T13:56:37+5:302020-05-08T13:56:59+5:30
जळगाव : दुरुस्त झालेली बुलेट घेण्यासाठी आलेले निवृत्त सहाय्यक फौजदार लक्झरी बसच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० ...

बुलेट घेण्यासाठी आलेले निवृत्त सहाय्यक फौजदार अपघातात ठार
जळगाव : दुरुस्त झालेली बुलेट घेण्यासाठी आलेले निवृत्त सहाय्यक फौजदार लक्झरी बसच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्टÑीय महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.
नारायण देवराम पाटील (रा. सामनेर ता. पाचोरा) असे ठार झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. ही बस मुंबईहून ओडिशाकडे हॉटेलचे कारागीर घेऊन निघाली होती. यात अनेक जण कुटुंबांसह निघाले होते.
अपघातानंतर बस औद्योगिक वसाहत पोलिसात आणण्यात आली. तिथे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. एकीकडे कोरोनाची बाधितांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे गर्दी वाढताच आता अपघातही होऊ लागले आहेत.