शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

निर्बंधामुळे धान्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 11:49 PM

ब्रेक द चेन : भाऊ देखील झाले कमी धान्याची आवक आली १० ते १५ टक्क्यांवर कोरोनाचा परिणाम : बळीराजाची ...

ब्रेक द चेन : भाऊ देखील झाले कमी

धान्याची आवक आली १० ते १५ टक्क्यांवरकोरोनाचा परिणाम : बळीराजाची शेती कामासाठी लगबग

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर  असलेल्या निर्बंधादरम्यान धान्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला आहे. दुकानांच्या वेळा मर्यादीत असल्याने या काळात धान्य विक्री पूर्णपणे होत नसल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्याची आवक १० ते १५ टक्क्यावर आली आहे. त्यात धान्याचे भावही कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला व  व्यवसायांवर परिणाम होणे सुरु झाले. कोरोना नियंत्रणासाठी जनता कर्फ्यू, तीन दिवस कडक निर्बंध असे नियम घालून देण्यात आले. तरीदेखील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अखेर  ‘ब्रेक द चेन’ लागू केले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी सात ते ११ या वेळेतच उघड्या ठेवण्याची अट घालण्यात आली. यामध्ये बाजार समितीमध्येदेखील याच वेळेत व्यवहार होत आहे.

बाजार समितीतील व्यवहारांवरदेखील वेळेच्या मर्यादा आल्याने ११ वाजेनंतर धान्य खरेदीदेखील केली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपला माल सकाळी ११ वाजेनंतर आणल्यास त्यांना तो परत न्यावा लागत आहे. त्यामुळे सकाळी चार तासात जेवढा माल खरेदी होईल तेवढाच माल बाजार समितीमध्ये उपलब्ध राहत आहे. परिणामी शेतकरीदेखील सकाळी उशीर झाल्यास माल आणत नसून दुसऱ्या दिवशी तो आणतात. दररोज अशा प्रकारे शेतकऱ्यांची संख्या कमी होत असल्याने आवकही घटत आहे.

खरीप हंगाम तोंडावर येत असल्याने शेती कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे घरात असलेला शेती माल विकणेही आवश्यक असल्याने शेतकरी तो विक्रीचा प्रयत्न करीत आहे. त्यात दुकानांच्या वेळा मर्यादीत असल्याने माल नेल्यानंतर जो भाव मिळेल त्या भावात त्याची विक्री करीत आहे.धान्य खरेदीचा हा हंगाम असून या काळात वर्षभराचे धान्य खरेदी करून ठेवले जाते. गेल्या महिन्यात गव्हाचे भाव वाढले होते. त्यानंतर आता निर्बंधादरम्यान आवक कमी झालेली असताना भाव देखील कमी झाले आहे. गव्हाचे भाव दोनशे रुपये प्रति क्विंटलने कमी झाले आहे.

दररोज होणारी आवक (क्विंटल मध्ये)धान्य - आवक -भावगहू -१५० ते २००- १८०० ते २३००ज्वारी -६४ -१२०० ते २०००दादर -५० - १४०० ते २२००लाल हरभरा -२०० -४८०० ते ४९००जाड हरभरा- १०० - ८६०० ते ८७००

टॅग्स :Jalgaonजळगाव