भुसावळात रोटरी ताप्ती व्हॅलीतर्फे शिक्षकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:05 IST2017-10-10T17:04:04+5:302017-10-10T17:05:08+5:30

भुसावळातील १५ शिक्षकांना नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्डचे वितरण

Respect for Teachers by Rotary Tapti Valley in Bhusaval | भुसावळात रोटरी ताप्ती व्हॅलीतर्फे शिक्षकांचा सन्मान

भुसावळात रोटरी ताप्ती व्हॅलीतर्फे शिक्षकांचा सन्मान

आॅनलाईन लोकमत
भुसावळ : रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘नेशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड-२०१७’ चे वितरण राधाकृष्ण लॉनवर झाले. शहरातील पंधरा शाळांमधील पंधरा शिक्षकांना ‘नेशन बिल्डर अ‍ॅवॉड’ देऊन गौरविण्यात आले.
रोटरी क्लब ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष धमेंद्र मेंडकी यांनी प्रास्ताविक केले. डिस्ट्रीक्ट लिटरसी चेअरमन डॉ.रश्मी शर्मा यांनी पुरस्काराचे महत्त्व सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या मंगला साबद्रा होत्या. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षकांची भूमिका ही राष्टÑ निर्माण कर्त्यांची असते, असे विचार व्यक्त केले. प्रमोद पिंगळे, अविनाश सचदेव यांनी परीश्रम घेतले. सहाय्यक प्रांतपाल मुकेश अग्रवाल यांनी सहकार्य केले. नम्रता बिपीन तायडे यांनी सूत्रसंचालन केले.
या शिक्षकांचा झाला सन्मान
रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे सुनीता बाळकृष्ण डोळे, एन.डी.राजपूत, धीरज जगन्नाथ तायडे, एन.एस. समदानी, जी.एस.जावळे, जयश्री काळवीट, दिलीप मेढे, एस.एस.सोनवणे, राजेंद्र रवींद्र महाजन, एन.एन.खैरनार, एल.पी.पाटील, एस.बी.ठाकूर, डी.पी.सुरवाडे, जे.ए.ढाके, जयश्री वाणी. राहुल नारायण पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

Web Title: Respect for Teachers by Rotary Tapti Valley in Bhusaval