मृतांवर अंत्यसंस्कार करणा-या कामगारांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:15 IST2021-04-16T04:15:52+5:302021-04-16T04:15:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : स्मशानभूमीत कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांचा गुरूवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनमत ...

Respect for the cremated workers | मृतांवर अंत्यसंस्कार करणा-या कामगारांचा सन्मान

मृतांवर अंत्यसंस्कार करणा-या कामगारांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : स्मशानभूमीत कोरोनाने मृत पावलेल्या नागरिकांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांचा गुरूवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्‍यात आला.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. मृत पावणाऱ्यांची संख्या सुध्दा वाढली आहे. त्यातचं मृत झालेल्या व्यक्तीचे रक्ताचे नाते असून सुद्धा काही परिवार अंतिम संस्कार करायला नाकारतात. अशा बिकट परिस्थितीमध्ये घनश्याम सपकाळे, काशिनाथ बिराडे, राजू कोल्हे, महेंद्र पाटील, पंढरी बिऱ्हाडे हे कामगार स्वतःचा जीव धोक्यात टाकून दररोज स्मशानभूमीमध्ये रक्ताचे नाते समजून मृतांवर अंत्यसंस्कार करतात. या कामगारांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गुरूवारी जनमत प्रतिष्ठान व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानतर्फे त्या कामगारांचा सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्‍यात आला.

Web Title: Respect for the cremated workers