शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
4
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
5
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
6
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
7
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
8
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
9
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
10
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
11
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
12
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
13
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
14
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
15
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
16
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
17
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
19
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
20
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर

भूलथापांना बळी पडू नका, रास्ता रोको होणारच, जळगावातील महामार्गाच्या कामासाठी निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 12:07 IST

आंदोलनावर ठाम राहण्याचा समांतर रस्ते कृती समितीच्या बैठकीत निर्णय

ठळक मुद्देसमांतर रस्त्यांसाठी दर शनिवारी रस्ता रोकोआंदोलनावर ठाम राहण्याचा समांतर रस्ते कृती समितीच्या बैठकीत निर्णय

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31- समांतर रस्त्यांचे काम तातडीने करण्यासाठी 10 जानेवारी रोजी करण्यात येणा:या ‘रस्ता रोको’बाबत कोणी कितीही भूलथापा दिल्या आणि काही अफवा पसरविल्या तरी त्यास बळी न पडता ठरलेल्या दिवशी आंदोलन करण्यावर ठाम राहण्याचा निर्णय समांतर रस्ते कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जो र्पयत हा प्रश्न मार्गी लागत नाही तो र्पयत दर शनिवारी रस्ता रोको करण्याचाही निर्धार या वेळी करण्यात आला. या आंदोलनात संघटनांच्या सहभागासाठी  30 डिसेंबर रोजी सायंकाळी  कांताई सभागृहात बैठक झाली. या बैठकीस माजी महापौर नितीन लढ्ढा,  करीम सालार, नगरसेवक अनंत जोशी, गनी मेमन, आयएमएचे सचिव डॉ. राजेश पाटील,  गजानन मालपुरे, शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख मंगला बारी, सुनंदा चौधरी,फारुक शेख, शंभू पाटील, विनोद देशमुख, दिलीप तिवारी, सचिन नारळे, अॅड. शिरीन अमरेलीवाला, अशफाक पिंजारी, सरिता माळी, विराज कावडिया, अमित जगताप, नवल गोपाल, विनोद कोळपकर, कासीम उमर, डॉ. आशीष जाधव, प्रा. वकार शेख, डॉ. शेख बशीर, विजय ठोसर, एन.एम. शहा आदी उपस्थित होते.

नेत्यांमधील समन्वयाअभावी समस्या कायमजळगाव जिल्ह्यातून मोठ-मोठय़ा पदावर राजकीय मंडळी पोहचली आहे. जिल्ह्यातूनच राष्ट्रपतीपद, विरोधा पक्षनेते, मंत्रीपदार्पयत असे किती तरी दिग्गज पोहचलेले आहे. मात्र समांतर रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. राजकीय नेत्यांच्या समन्वयाअभावी ही समस्या कायम असल्याचाही सूर या वेळी उमटला. 

आमदारांची अनुपस्थितीमहामार्गाच्या कामासाठी 474 कोटीच्या आराखडय़ापैकी 100 कोटी मंजूर झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हे काम मार्गी लागेल, असे आमदार सुरेश भोळे यांचे म्हणणे असून मग त्यांनी या बैठकीस यायला हवे होते, अशीही चर्चा यावेळी झाली.

नियोजनाबाबत होणार चर्चाआंदोलनाची अंतिम दिशा ठरविताना किती वेळ महामार्ग रोखावा, कोणकोणत्या चौकात रस्ता रोको करावा, कोठे किती कार्यकर्ते असावे याच्या नियोजनासाठी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून जो निर्णय होईल तो सर्वाना मान्य राहील, असेही या वेळी सांगण्यात आले. रस्तारोको करावा की नाही, याबाबत हात उंचावून अंतिम निर्णय घेण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून आवश्यक त्या सूचना मांडल्या. 

10 दिवस वाट पाहूरस्तारोकोला अजून 10 दिवस आहे. तो र्पयत मागण्यांबाबत काय निर्णय होतो, याची प्रतीक्षा करू. मागण्या मान्य झाल्याच नाही तर रस्ता रोको करूच, असे ठरविण्यात आले. 

आयएमए, व्यापारी महामंडळाकडून जनजागृतीस मदतरस्तारोकोमध्ये जास्तीत जास्त संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. यामध्ये विद्यार्थीही सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी आयएमएतर्फे 50 हजार पत्रक तर व्यापारी महामंडळाच्यावतीने बॅनर छापून देणार असल्याचे सांगण्यात आले. 

समिती बैठकीत चार ठराव मंजूरसमांतर रस्ते कृती समितीच्या या बैठकीत चार ठरावांचे दिलीप तिवारी यांनी वाचन केले व सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 10 जानेवारी रोजी रस्ता रोकोनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येईल. यामध्ये दररोज नवीन संस्था, संघटना सहभागी होतील. त्यानंतर उपोषण वा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून त्याच दरम्यान चार ते पाच लक्झरी बसेस घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणेविविध मार्गानी निषेध नोंदविणे, यामध्ये सामूहिक मुंडण, पथनाटय़ाद्वारे निषेध नोंदविणे असे उपक्रम सुरू ठेवण्याचे सभेत ठरले. 

कांताई सभागृहात समितीचे अस्थायी कार्यालयसमांतर रस्ते कृती समितीचे अस्थायी स्वरुपाचे कार्यालय कांताई सभागृहात असून संध्याकाळी सहा ते सात वाजेर्पयत येथे समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.