म्हणण्याची वेळ आली आहे.तालुक्यात सरासरी ६०० मिमी पेक्षा जास्त म्हणजे ११० टक्के पाऊस पडला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू असून, ७९ मतदार असलेल्या विकास सोसायटीच्या मतदारसंघासाठी तालुक्यातून उमेदवार निवडला जातो. गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये आ. किशोर पाटील यांचेच वर्चस्व अबाधित राहिले. यावेळी बिनविरोधचे वारे जिल्हापातळीवर चालू असतानाच तालुक्यातील पक्षीय मोर्चेबांधणीमध्ये सोसायटी मतदारसंघात कोणत्या पक्षाचे ठराव जास्त तो वरचढ ठरणार आहे ते काळच ठरवेल. यावेळी पंडितराव शिंदे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे चर्चिले जात असून आमदार किशोर पाटील यांची पकड सोसायटी मतदारसंघात राहिली असल्याने बँक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
कोरोनाच्या निर्बंधांची ऐशीतैशी असून सर्वच
ठिकाणी निर्बंध पायदळी तुडवले जात आहेत. प्रशासनाने हात टेकले असून, आता निर्बंधांतून मुक्ती मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शाळा, कॉलेज, देवालये बंदच असून खासगी शिकवणी वर्ग सर्रास सुरू आहेत त्यांच्यावर शिक्षण विभागाची मेहरबानी असून, खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थ्यांना काहीही होत नाही, मग शाळा, कॉलेजमध्येच कोरोनाची भीती आहे का, असा प्रश्न पालकवर्ग विचारत आहे. शाळा, कॉलेज, मंदिरे उघडावी अशी मागणी होत आहे.
वार्तापत्र