अवैध धंद्याची तक्रार करा अपर पोलीस अधीक्षकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:22+5:302021-04-06T04:16:22+5:30
जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेला सट्टा, पत्ता,जुगार, अवैध दारू, गुटखा यासह इतर कोणत्याही अवैध धंद्याची माहिती मिळाली तर आता ...

अवैध धंद्याची तक्रार करा अपर पोलीस अधीक्षकांना
जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेला सट्टा, पत्ता,जुगार, अवैध दारू, गुटखा यासह इतर कोणत्याही अवैध धंद्याची माहिती मिळाली तर आता थेट अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मोबाइलवर पाठवण्याचे आवाहन जनतेला करण्यात आलेले आहे. चंद्रकांत गवळी यांनी त्यासाठी स्वतःचा व्हॉट्स ॲप क्रमांक जाहीर केलेला आहे.
दरम्यान, अवैध धंद्यासह जनतेच्या पोलीस कामकाजविषयी तक्रारी किंवा पोलिसांचीही आपल्या विभागात कोणाविषयी तक्रार असेल तर ती व्हॉट्स ॲप क्रमांकावर करण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
दोन वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी अवैध धंद्यांविषयी माहिती पुरवण्याचे थेट जनतेला आवाहन करून स्वतःचा मोबाइल क्रमांक जाहीर केला होता. आता अप्पर पोलीस अधीक्षक गवळी यांनी आपला क्रमांक जाहीर केला आहे. पोलिसांच्या तक्रारीविषयी याआधीच समाधान हेल्पलाइन योजना सुरू झालेली आहे त्याचे नियंत्रण पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) यांच्याकडे आहे.