माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 13:05 IST2019-05-30T13:05:33+5:302019-05-30T13:05:57+5:30

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माध्यमिकला

Replacement of Secondary Education Officer Devidas Mahajan | माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बदली

माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची बदली

जळगाव : शालेय शिक्षण मंत्रालयाकडून राज्यातील १४ शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असुन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या देखील बदल्यांचे आदेश बुधवारी पारीत झाले आहे. त्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांची नाशिक मनपाच्या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांची बदली झाली आहे.
आचारसंहितेमुळे बदल्यांची प्रक्रीया थांबविण्यात आली होती. मात्र आचारसंहीता संपल्यानंतर बदल्यांच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर त्यांच्या जागी अद्याप कुणाची ही पदस्थापना नाही. भास्कर पाटील गुरूवारी ३० रोजी माध्यमिकचा विभागाचा पदभार स्विकारतील. तर माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक मनपात रूजू होणार आहे. जळगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची माध्यमिक उपशिक्षणाधिकारीपदी बदली झाली असून त्यांच्या जागी पालघरचे गटशिक्षणाधिकारी सतिश चौधरी रूजू होणार आहे. चाळीसगावचे गटशिक्षणाधिकारी सतिष परदेशी यांची भडगाव पं.स.त बदली झाली आहे.

Web Title: Replacement of Secondary Education Officer Devidas Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव