भुसावळजवळ अखेर महामार्गावर डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:46 IST2020-09-20T15:45:10+5:302020-09-20T15:46:11+5:30
अखेर महामार्गावर डागडुजीचे काम रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे.

भुसावळजवळ अखेर महामार्गावर डागडुजी
दीपनगर, ता.भुसावळ : चौपदरीकरणाच्या कामात जुन्या महामार्गावर पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी थेट महामार्गातच साचले होते. यातून वाहनधारकांसह सर्वांनाच त्रास होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच त्याची दखल घेत अखेर महामार्गावर डागडुजीचे काम रविवारी सकाळपासून सुरू करण्यात आले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग काढण्याचे काम कर्मचारी करीत होते.
भुसावळजवळ राष्टÑीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी चक्क महामार्गावरच साचले होते. यामुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात कोडी होत होती व रहिवास असलेल्या नागरिकाचे ये-जा करताना हाल होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध करताच महामार्गावर रविवारी सकाळी रस्त्याची डागडुजी करण्यात आली. यामुळे वाहनधारकांना तूर्त दिलासा मिळणार आहे.