रस्त्याची डागडूजी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:16 IST2021-03-27T04:16:45+5:302021-03-27T04:16:45+5:30

शौचालयाचे बांधकाम जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सार्वजिनक शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पार्किंगच्या ठिकाणी हे ...

Repair the road | रस्त्याची डागडूजी करा

रस्त्याची डागडूजी करा

शौचालयाचे बांधकाम

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सार्वजिनक शौचालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. पार्किंगच्या ठिकाणी हे काम केले जात आहे. स्वच्छता गृह नसल्याने नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा समाना करावा लागत होता. त्यामुळे हे शौचालय बांधण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.

नवीन कॅमेरे

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात आणखी नवीन सीसीटीव्ही कॅमेेरे बसविले जात आहेत. सर्वच परिसरांवर सीसीटीव्हीची नजर असून यावर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कक्षातून नजर ठेवली जाते. आता वाहने पार्किंग करण्याच्या भागातही नवी कॅमेरे बसविण्यात आले आहे.

बांधकाम समितीचा आढावा

जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सभा पार पडली. यात उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती लालचंद पाटील यांनी कामांचा आढावा घेतला. निर्बंधांमुळे ही सभाही ऑनलाईन घेण्यात आली. मार्च अखेर निधीची उपलब्धता आदींबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. अधिकारी व सदस्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला होता.

Web Title: Repair the road