धर्म प्राणीमात्रांच्या कल्याणाचे साधन -अक्षयसागरजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 23:38 IST2019-12-10T23:37:18+5:302019-12-10T23:38:35+5:30
धर्म हे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचे साधन आहे.

धर्म प्राणीमात्रांच्या कल्याणाचे साधन -अक्षयसागरजी महाराज
जामनेर, जि.जळगाव : धर्म हे सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाचे साधन आहे. आतापर्यंत जेवढे आत्मा, परमात्मा झालेत ते फक्त धमार्मुळेच. धर्मच व्यक्तीला महान बनवू शकतो. धर्माच्अभावी जसा दिवा विझल्यानंतर अंधारास बोलावण्याची गरज नाही. तसेच पुण्य संपल्यानंतर दु:ख व संकटांना बोलवावे लागत नाही, असे विचार अक्षयसागरजी महाराज यांनी येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात प्रवचनात मांडले.
अक्षयसागर हे परमपूज्य विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य आहेत. त्यांनी सांगितले की, आपण पाश्चात्य संस्कृती अंगी कारल्यामुळे खूप मोठा ºहास होत आहे. मुलांच्या वाढदिवसाला मेणबत्ती विझवून टाकणे शिकवतो, त्याऐवजी त्याना मंदिरात नेऊन भगवंताचे दर्शन घेण्यास सांगावे. दान करणे शिकवावे. हे संस्कार पुढच्या पिढीला उपयोगी ठरतील. ज्या धर्माने आत्मकल्याण होते तो धर्म श्रेष्ठ होय.
सुखाचे कारण धन नाही तर धर्म आहे. दररोज उगवणाऱ्या सूर्याचाही सायंकाळी अस्त होतो. त्याप्रमाणे आपलाही मृत्यू निश्चित आहे म्हणून प्रत्येक क्षण सत्कमार्साठी वापरला पाहिजे. आपल्या गुरुवर आपला विश्वास असला पाहिजे. व्यक्ती विनयशील असला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रवचनास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.