निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST2021-06-02T04:14:12+5:302021-06-02T04:14:12+5:30

धरणगाव शहरासह तालुक्यामध्ये २६ ते २९ मेदरम्यान एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याने तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मंदावला आहे, तर पंधरा दिवसात ...

Relief to farmers, including the general public, as restrictions have eased | निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा

निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा

धरणगाव शहरासह तालुक्यामध्ये २६ ते २९ मेदरम्यान एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याने तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मंदावला आहे, तर पंधरा दिवसात कोरोनाचे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. २६ ते २९ मे यादरम्यान तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

प्रशासनाच्या, डॉक्टरांच्या अहोरात्र मेहनतीमुळे तालुक्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्यास मदत झाली आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नियमांच्या आधारे आवश्यक असलेल्या दुकानांसोबतच इतर सेवांची दुकानेही सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कृषी संबंधित सेवा पुरवणारी दुकाने ही दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या अतिरिक्त वेळेत सुरू राहणार आहेत.

Web Title: Relief to farmers, including the general public, as restrictions have eased