नववर्षाच्या पहिल्या महिन्यात कोरोनातून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:46+5:302021-02-05T06:00:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २०२० मध्ये कहर केलेल्या कोरोनातून २०२१च्या पहिल्याच महिन्यात जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकत्रित ...

नववर्षाच्या पहिल्या महिन्यात कोरोनातून दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : २०२० मध्ये कहर केलेल्या कोरोनातून २०२१च्या पहिल्याच महिन्यात जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकत्रित महिन्याभराचे चित्र बघता, या महिन्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ८२ ने अधिक असून, यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढून ९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. अनेक तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्याही अगदीच कमी असल्याने कोरोना आता जातोय, असे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग हा सर्वत्रच कमी होत आहे. जिल्ह्यातही नियमित आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे कमी झाले आहे. एकत्रितच संसर्गाचे प्रमाण कमी होणे, ॲन्टीबॉडी विकसित होणे, आधीपेक्षा आता वैयक्तिक सुरक्षेबाबत दक्षता ठेवणे, या बाबींमुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे जळगाव शहरातही कोरोना संमिश्र स्वरूपात राहिला.
स्ट्रेन कोरोना गेला?
विदेशातून आलेल्यांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना असल्याचे निदान देशात काही ठिकाणी झाले होते. मात्र, जिल्ह्यात या कोरोनाचा शिरकाव झालाच नसल्याने आता स्ट्रेन कोरोना गेला, असेही सांगितले जात आहे, शिवाय लसीकरणाला सुरुवात झाल्याने आता कोरेानाची भीतीही कमी झाल्याचे चित्र आहे.