शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

भुसावळ येथे सिमेंट बाकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:27 PM

भुसावळ तालुक्यासह शहरात विकास कामाचा आराखडा सुरूच ठेवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट बाकांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

ठळक मुद्देविकास कामाचा रथ अखंड सुरू ठेवू -आमदार सावकारेभुसावळ शहरात १५ ठिकाणी, तर वरणगाव येथे ठेवण्यात आले १७ बाक

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यासह शहरात विकास कामाचा आराखडा सुरूच ठेवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट बाकांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.दरम्यान, भुसावळ बसस्थानकाची राज्यात नव्हे तर रेल्वेमुळे देशात ओळख आहे व तेथे दयनीय अवस्था आहे. बाक ठेवण्यात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्या हस्तेही फीत कापून बाकांचे लोकार्पण झाले.यावेळी पुढे बोलताना आमदार सावकारे पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, प्रवाशी, चौक, स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना बाकांअभावी बैठकीची कुठलीही व्यवस्था नव्हती. जनतेच्या सुविधेसाठी भुसावळ बसस्थानक व अन्य ठिकाणी १५, तर वरणगाव येथे १७ बाके लावण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत असल्याचेही सांगितले.याप्रसंगी प्रा.सुनील नेवे, माजी उपनगराध्यक्ष हाजी शफी पहेलवान, युवराज लोणारी, बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, प्रा.दिनेश राठी, किरण कोलते, किशोर पाटील, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, शैलेजा पाटील, विभागीय अभियंता आर.व्ही.चव्हाण, कनिष्ठ अभियंता एस.यु.कुरेशी, बी.एम.पठार, आगार व्यवस्थापक हरीष भोई, स्थानकप्रमुख पी.बी.भोई, एस.टी. कॅन्टीन असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सैनी, वाहतूक नियंत्रक व्ही.सी.वानखेडे, अनिकेत पाटील, पवन बुंदेले, एस.बी.शेळके, अनिल पाटील, सुरेश ढंढोरे, प्रवीण जवरे, सुरेश ढंढोरे, सुरेंद्र सिंग, अशोक हिगणे, एटीआय आर.एस.पाटील, राजेंद्र आवटे, ए.जे.अंबोले, दीपक कोळी आदी उपस्थित होते.दरम्यान, कॅन्टीनलगत असलेल्या गटारीतील सांडपाणी जाण्यासाठी असलेली गटार रेल्वे विभागाने बंद केल्याने तत्काळ त्यांनी विभागीय अभियंता तोमर,अनुभाग अभियंता देशपांडे यांना बोलवून घेत चर्चा करून प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना केली.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ