रुग्णांच्या भेटीसाठी पीपीई किट सक्तीमुळे जळगावात नातेवाईक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:16+5:302021-05-17T04:15:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना पीपीई किटची सक्ती केल्याने रविवारी ...

Relatives aggressive in Jalgaon due to PPE kit forced for patient visit | रुग्णांच्या भेटीसाठी पीपीई किट सक्तीमुळे जळगावात नातेवाईक आक्रमक

रुग्णांच्या भेटीसाठी पीपीई किट सक्तीमुळे जळगावात नातेवाईक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना पीपीई किटची सक्ती केल्याने रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर नातेवाईक आक्रमक झाले. नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन करीत रुग्णालय प्रशासनाने ५० पीपीई किट उपलब्ध करून दिल्यानंतर वादावर पडदा पडला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेटवर रविवारी सकाळी ११ ते १ या वेळेत प्रचंड गोंधळ झाला होता. महिलांनी रुग्णालयासमोर रास्ता रोको केला, यासह गेटवर धाव घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मोठा पोलीस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पीपीई किट महाग असताना आम्ही ते तीन तीन वेळा नवीन कसे खरेदी करावे? असा सवाल उपस्थित करून नातेवाईकानी संताप व्यक्त केला होता. अखेरीस रुग्णालय प्रशासनाने ५० पीपीई किट उपलब्ध करून नातेवाईकांना जेवणाचा डबा देण्यासाठी आत सोडल्याने तणाव निवळला होता.

Web Title: Relatives aggressive in Jalgaon due to PPE kit forced for patient visit