रिल्सस्टार हितेश पाटील याच्या खूनप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपी जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील याला पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानेच विठ्ठल पाटील यांच्या सांगण्यावरून दोरीने हितेशचा गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.
विठ्ठल पाटील यांनी जेसीबी चालक रवींद्र पाटील यास सांगितले की, हितेश हा आम्हाला खूप त्रास देतो व मारहाण करतो. म्हणून त्याचा कायमचा सोक्षमोक्ष लाव. त्यानुसार जेसीबी चालक रवींद्र पाटील याने हितेशला गोड बोलून शेतात नेले. तिथे त्याने हितेशला दारू पाजली. तो मद्यधुंदीत झोपेत असताना आरोपी रवींद्र पाटील याने हितेशचा गळ्याभोवती दोरीने आवळून खून केला. त्यानंतर त्याने विठ्ठल पाटील व नामदेव पाटील यांना शेतात बोलवले. नंतर या तिन्ही आरोपींनी गोविंद बाबा धरणाच्या कोरड्या पात्रात जेसीबीने खड्डा करून त्यात हितेशचा मृतदेह पुरला, अशी माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, मुलाची हत्या झाल्यानंतर वडील विठ्ठल पाटील यांनी गळफास लावून घेतला. मृत्यूआधी विठ्ठल पाटील यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.