राखीव पोलीस बलासाठी भरती प्रक्रीया सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:24 PM2019-12-02T12:24:02+5:302019-12-02T12:24:51+5:30

जळगाव : वरणगाव-हतनुर (ता. भुसावळ) येथे नव्याने निर्माण होत असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ च्या आस्थापनेवरील सशस्त्र ...

 The recruitment process for the reserve police force began | राखीव पोलीस बलासाठी भरती प्रक्रीया सुरु

राखीव पोलीस बलासाठी भरती प्रक्रीया सुरु

Next

जळगाव : वरणगाव-हतनुर (ता. भुसावळ) येथे नव्याने निर्माण होत असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ च्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. २ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत आॅनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ६ धुळे येथील कवायत मैदानावर होणार आहे.
या भरतीप्रक्रियेत सुरुवातीलाच आॅनलाईन पध्दतीने लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार शारीरीक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरीक चाचणी घेण्यात येईल, असे कळवण्यात आले आहे.
लेखी व शारीरीक चाचणीत प्राप्त झालेल्या एकुण गुणांच्या गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची तयार करण्यात येईल. त्यात निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल व त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवडसूचीत निवड केली जाणार आहे. ही निवड तात्पुरती असल्याने त्यावर उमेदवाराला हक्क मागता येणार
नाही.
रिक्त पदांची संख्या, पूर्ण पदे भरण्याबाबत शासन आदेशाच्या अधीन राहून पद संख्या कमी जास्त झाल्यास उमेदवार निवडीबाबत कोणताही दावा करणार नाही असे भरतीबाबत काढण्यात आलेल्या याबाबत काढलेल्या परिपत्रकात नमूद आहे.
उमेदवारांनी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाची माहिती, परीक्षा शुल्क व आवेदन अर्ज सादर करण्याची वेळ , तारीख व इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
प्रभारी समादेशक धुळे तथा नियंत्रण अधिकारी राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ हतनुर-वरणगावचे सुरेश माटे यांच्या नियंत्रणात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे कळवण्यात आले आहे.

Web Title:  The recruitment process for the reserve police force began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.