शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:22 IST

निधीही मंजूर

ठळक मुद्देचिंचोली शिवारात उभे राहणार वैद्यकीय संकूलद्वितीय व तृतीय वर्षाच्या कामासंबंधी घेतला आढावा

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - जळगाव येथे चिंचोली शिवारात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्यावतीने मान्यता देण्यात आली असून त्यासाठी १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात १० मे रोजी निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रि येनंतर बांधकामास सुरुवात होणार आहे.जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. त्यानुसार जळगाव-औरंगाबाद मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल. चिंचोली शिवारातील ही जागा गेल्या महिन्यातच वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाली होती.तूर्त हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयातपासून सुरू होणार असले तरी चिंचोली शिवारात बांधकामासाठी मंजुरीसाठी प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार १० मे रोजी शासन निर्णय होऊन या महाविद्यालयाच्या बांधकामास शासनाने मंजुरी दिली आहे.निधी मंजूरया महाविद्यालयाच्या बांधकामासाठी २०८ कोटी ७९ लाख एवढी प्रस्तावित रक्कम आहे. त्यापैकी १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून बांधकामास सुरूवात होईल, असे सांगण्यात आले.द्वितीय व तृतीय वर्षाच्या कामासंबंधी घेतला आढावावैद्यकीय महाविद्यालयातील सर्व त्रुटी दूर झाल्या असून एमसीआयच्या समितीने पाहणी केल्यानंतर आता मान्यता दिली. त्यामुळे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होईल. - डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय. वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा रुग्णालयापासून त्याची सुुरुवात होणार असून त्याचे काम येथे युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी १० मे रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप संचालक डॉ. तात्याराव लहाने हे येणार होते. मात्र ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. मात्र तयारी संदर्भात अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये आॅगस्टमध्ये प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास सुरुवात होणार असून आता द्वितीय व तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जिल्हा रुग्णालय झाले चकाचकडॉ. तात्याराव लहाने हे पाहणी करण्यासाठी येणार असल्याने जिल्हा रुग्णालयात सकाळपासूनच स्वच्छता केली जात होती. यामध्ये परिसर स्वच्छ करण्यासह भींतीवरील टाईल्सही स्वच्छ करण्यात आल्या.चिंचोली शिवारात उभारण्यात येणाºया वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामास मान्यता मिळाली असून त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव