पारोळा तालुका ग्रंथालय संघातर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:17 IST2021-07-30T04:17:52+5:302021-07-30T04:17:52+5:30
पारोळा : नाशिक विभाग ग्रंथालय संघावर सतीश पाटील यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा पारोळा तालुका ग्रंथालय संघातर्फे ...

पारोळा तालुका ग्रंथालय संघातर्फे सत्कार
पारोळा : नाशिक विभाग ग्रंथालय संघावर सतीश पाटील यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा पारोळा तालुका ग्रंथालय संघातर्फे सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी डॉ. शांताराम पाटील, तर पाहुणे म्हणून तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, महाराष्ट्र ग्रंथालय सेना जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.
पोलीस पाटील संघटनेचे सुकलाल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी शिवाजी पाटील पोलीस पाटील (मुंदाणे), रवी जाधव, दिगंबर पाटील, सुनील पाटील, रवी पाटील, विनोद पाटील, गुलाब वाघ, कैलास पाटील, जगताप उपस्थित होते.