शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

जळगाव जिल्ह्यात १५ हजार नव्हे ११५४ शेतकºयांचीच यादी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:36 PM

आधी दिलेली यादी रद्द करून दिली सुधारीत यादी

ठळक मुद्दे६ कोटी ६१ लाख बँकेकडे जमा३२ पैकी २९ शेतकºयांना प्रतीक्षाचविकासोनिहाय याद्यांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जिल्ह्णातील १५ हजार शेतकरी पहिल्या टप्प्यात कर्जमाफीला पात्र ठरले असल्याचा व त्यांच्या कर्जमाफीसाठी ३०६ कोटीची रक्कम शेतकºयांच्या नावावर जमा करण्यासाठी बँकांकडे देण्यात आली असल्याचा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी पाणी आरक्षण व टंचाई आढावा बैठकीत होता. मात्र प्रत्यक्षात जिल्हा बँकेकडे आतापर्यंत केवळ ११७९ पात्र शेतकºयांची यादी (ग्रीन लीस्ट) पहिल्या टप्प्यात प्राप्त झाली होती. तसेच त्यांच्या कर्जमाफीसाठीची ६ कोटी ७७ लाखांची रक्कम बँकेला प्राप्त झाली  होती.  ती यादी देखील शुक्रवार दि.१० रोजी बदलून नवीन यादी घेण्याची अजब सूचना शासनाने केली आहे.कर्जमाफी फसवी असल्याची टीका वाढली असून गुरूवारी पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत राष्टÑवादीकाँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी कर्जमाफी कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तांत्रिक कारणामुळे ही कर्जमाफी लांबली. मात्र तरीही राज्यातील १ लाख २ हजार शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम ३ हजार ४०० कोटी त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी बँकांकडे देण्यात आली आहे.जळगाव जिल्ह्णातील १५ हजार शेतकºयांची कर्जमाफीची रक्कम ३०६ कोटी शेतकºयांच्या नावावर जमा करण्यासाठी बँकांकडे देण्यात आली असल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला होता. मात्र याबाबत माहिती घेतली असता जिल्हा बँकेत शुक्रवार १०नोव्हेंबरपर्यंत केवळ ११७० शेतकºयांची यादीच प्राप्त झालेली असल्याचे व त्यापोटी ६ कोटी ९० लाखांची रक्कम बँकेकडे जमा     झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३२ पैकी २९ शेतकºयांना प्रतीक्षाचजिल्हा प्रशासनाने शासनाच्या सूचनेनुसार दिवाळीतच ३२ लोकांची निवड करून त्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३२ शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्रही वाटप जाहीर कार्यक्रमात करण्यात आले. मात्र ग्रीन लिस्टमध्ये त्यांचे नाव आल्याशिवाय त्यांची कर्जमाफी होणे अशक्य आहे. जिल्हा बँकेकडे प्राप्त ११७० पात्र शेतकºयांच्या पहिल्या यादीत या ३२ शेतकºयांपैकी केवळ ३ शेतकºयांचीच नावे आढळून आली आहेत. त्यामुळे उर्वरीत २९ शेतकºयांच्या नावांचा शोध या यादीत घेणे सुरू असून पुढील यादीत ती नावे येण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती जिल्हा बँकेतील सूत्रांनी दिली.विकासोनिहाय याद्यांची गरजशासनाने बँकेकडे पात्र शेतकºयांची नावे व पैसे जमा करणे सुरू केले असले तरीही विकासो निहाय यादीच शासनाने देणे बँकांना अपेक्षित आहे. त्याशिवाय त्यांना कर्जमाफीची रक्कम त्या शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यास अडचणी येणार आहेत. प्रत्येक शेतकºयांची ओळख पटविण्यात प्रचंड कालावधी लागू शकतो. त्यामुळे शासनाने विकासोनिहाय याद्या देण्याची मागणी होत आहे. गुरूवारी झालेल्या टंचाई आढावा बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.यादीत केला बदल : ११७९ ऐवजी ११५४ सुधारीत यादीकर्जमाफीच्या यादीचा सावळा गोंधळ मिटण्याची चिन्ह काही दिसत नसून पालकमंत्र्यांनी दावा केलेल्या १५ हजार शेतकºयांपैकी फक्त ११७९ शेतकºयांचीच यादी जिल्हा बँकेला प्राप्त झालेली होती. त्यासाठी ६ कोटी ७७ लाख ८१ हजार २९६ रूपयांची कर्जमाफी देण्याचे नमूद होते. मात्र कर्ज विकासोचे व यादी केवळ नावांची असल्याने जिल्हाभरातून लाभार्थीचा शोध घेणे अवघड असल्याने बँकेकडून रक्कम संबंधीत शेतकºयांच्या खात्यावर लगेचच वर्ग झाली नव्हती. दरम्यान शुक्रवार, दि.१० रोजी शासनाकडून आधीची यादी रद्द करून सुधारीत ११५४ लोकांचीच सुधारीत यादी पाठविण्यात आली. त्यांची केवळ ६ कोटी ६१ लाख ४६ हजार ४६० रूपयांची कर्जरक्कम खात्यावर वळती करण्याचे सूचित करण्यात आले. त्यामुळे याद्यांचा घोळ अद्यापही सुरूच असल्याचे स्पष्ट आहे. तसेच जर ही रक्कम आधीच्या यादीनुसार बँकेने लगेचच खात्यावर वर्ग करून टाकली असती तर आज किमान २५ शेतकºयांच्या खात्यावरून ही रक्कम परत कशी घ्यायची? असा पेच बँकेसमोर उभा ठाकला असता.का बदलली यादी?काही शेतकºयांनी एकापेक्षा अधिक बँकांमधून कर्ज घेतलेले आहे. मात्र त्याची एकूण रक्कम दीड लाखाच्याआत असणे आवश्यक आहे. मात्र काही शेतकºयांनी एका बँकेकडे ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) साठी प्रस्ताव दिला. तर दुसरीकडे कर्जमाफीचा अर्ज दिला. ओटीएसची माहिती शासनाकडे आल्यावर हे निदर्शनास आल्याने यादीत बदल करण्यात येऊन अशा शेतकºयांना अपात्र ठरविण्यात आल्याचे समजते.