धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 04:04 PM2020-10-18T16:04:18+5:302020-10-18T16:05:38+5:30

शतक महोत्सवी पी.आर.हायस्कूलमध्ये वाचनप्रेरणा दिवसानिमित्त अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली.

Reading competition on the occasion of Reading Inspiration Day at PR High School, Dharangaon | धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धा

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धा

googlenewsNext

धरणगाव : येथील शतक महोत्सवी पी.आर.हायस्कूलमध्ये वाचनप्रेरणा दिवसानिमित्त अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली.
धरणगाव 'सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नसून रोजचे वृत्तपत्र, ई-बुक्स, ई-मॅगझिन, ई-वृत्तपत्र वाचन हे खरे वाचन असते. ते हातावरच्या एका बोटावर मोबाईल, संगणकाच्या माध्यमातून वाचता येते किंवा थेट पुस्तके, वृत्तपत्र वाचूनही भौतिक माध्यमाने वाचन करून आपले ज्ञान अद्ययावत करता येऊ शकते, म्हणून वाचाल तर वाचाल ही उक्ती आपल्या व्यक्तिमत्वात भिनवावी, असा सल्ला उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांसाठी एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आॅनलाईन प्रश्नमंजूषा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'मी राष्ट्रपती झालो तर -' या विषयावर आॅनलाईन निबंध स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन अभिवाचन आयोजित करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये दोनशे विद्यार्थी सहभागी झाले.
प्रारंभी उपमुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी वाचायचे कशासाठी? या विषयावर विद्यार्थ्यांशी आॅनलाईन संवाद साधला.
स्पर्धा प्रमुख गणेशसिंह सूर्यवंशी यांनी सूत्रसंचलन व अभिवाचनाचे महत्त्व विशद केले. निबंध स्पधेर्चे स्पर्धेचे संयोजन संजय बेलदार यांनी तर प्रश्नमंजुषेचे संयोजन डॉ.वैशाली गालापुरे यांनी केले. मुख्याध्यापक एस.एम.अमृतकर आणि पर्यवेक्षक आर. के. सपकाळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Reading competition on the occasion of Reading Inspiration Day at PR High School, Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.