उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची २३ ऑगस्टपासून फेरपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:08+5:302021-08-19T04:21:08+5:30

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ...

Re-examination of students who are deprived of summer examination from 23rd August | उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची २३ ऑगस्टपासून फेरपरीक्षा

उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची २३ ऑगस्टपासून फेरपरीक्षा

जळगाव : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उन्हाळी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

८ जून २०२१ पासून ३१ जुलै २०२१ पर्यंत झालेल्या (उन्हाळी) परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेमधील बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. बहिस्थ लेखी परीक्षा २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात स्मार्ट फोन/ लॅपटॉप/ डेस्क टाॅप वेब कॅमेऱ्यासह याद्वारे घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी या कालावधीत विद्यापीठ संकेतस्थळावर देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन परीक्षा द्यावयाची आहे.

बहिस्थ लेखी परीक्षांमधील जे विद्यार्थी बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित राहिले किंवा नापास झाले असतील, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष न बोलाविता २१ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन करून, त्यांचे गुण २३ ऑगस्टपर्यंत विद्यापीठात पाठविण्याच्या सूचना विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. या परीक्षांना ८ जून ते ३१ जुलैपर्यंत झालेल्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर केले असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रविष्ट होता येईल. याबाबत काही अडचणी असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. किशोर पवार यांनी दिली.

Web Title: Re-examination of students who are deprived of summer examination from 23rd August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.