पारोळा : अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी रवींद्र लोटन पाटील (पारोळा) यांची सवार्नुमते निवड करण्यात आली आहे.पुणे येथे नुकतीच संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात पाटील यांची निवड झाली. तर पारोळा गटशिक्षणाधिकारी सी.एम. चौधरी यांची संघटनेच्या राज्य संचालकपदी निवड झाली.मल्हारी शिंदे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर ही निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामचंद्र सैंदाणे होते. बैठकीस राज्य सचिव परमेश्वर बाबर, राज्य संचालिका प्राची थत्ते, संचालिका पद्मिनी कासेवाड, संजय जाधव, सुधाकर शेवाळे, हणमंतराव अवघडे, महेंद्र पाटील, महादेव सरवदे, उमरे (गडचिरोली), गणेश भंगाळे (यवतमाळ), संजय चौगुले (कोल्हापूर), जयवंत पाटील (सांगली), धनंजय घाटे (पुणे) आणि चेतन निकम (रत्नागिरी) आदी उपस्थित होते . महेश दरेकर, मीना चव्हाण, ओंकार ओक आदींनी परिश्रम घेतले
अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी रवींद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:22 IST