रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:28 PM2019-07-27T23:28:03+5:302019-07-27T23:30:50+5:30

रावेर तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून सट्याबेटींग घेणाऱ्या बºहाणूपर बेटींग घेणाºया मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ravi taluka raid on three sites in three places | रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी

रावेर तालुक्यात तीन ठिकाणी सट्टा पेढ्यांवर धाडी

Next
ठळक मुद्दे१४ जणांविरुद्ध गुन्हा दाखलखानापूर, वाघोड व रावेर येथे सट्ट्यावर संक्रांतवाघोड येथे देशी दारू दुकानावर धाड

रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील खानापूर येथे तब्बल दीड ते दोन वर्षांपासून बंद पडलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंदेवाईकांनी पुन्हा डोके वर काढल्याने शनिवारी जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पोलीस पथकाने येथे येऊन दुपारी खानापूर व वाघोड येथे अचानक धाड टाकून सट्याबेटींग घेणाऱ्या बºहाणूपर बेटींग घेणाºया मालकासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या धाडीत खानापूर येथून ९, वाघोड येथील एक व रावेर येथील एक अशा ११ आरोपींना अटक करून १५ हजारांची रोकड व साहित्य पोलिसांनी जप्त केले.
खानापूर येथील सप्तशृंंगी नगरातील एका टपरीच्या आडोशाला सट्टा जुगाराचा खेळ खेळवणाºया आरोपी शेख लूकमान शेख चाँद (वय ४५) , शेख आरीफ शेख कमरोद्दीन (वय ४१) , शेख सुल्तान शेख चाँद (वय ३२) व मालक सुनील महाजन चौघे रा.खानापूर, ता.रावेर व सट्टा खेळण्यासाठी बºहाणपूर येथून आलेले खुर्शीद शे अहमद (वय ३६), मोहंमद जाकीर मोहंम्मद जहीर (वय २८), मोहंमद हारूण शफीउल्लाह (वय ४०), जाकीर अली अब्बास अली (वय २८), भुरा मोहन बारेला (वय ३०), मोहंमद हारूण मोहम्मद फारूख (वय ३५) यातील नऊ आरोपींना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून ११ हजार ४३० रोकड व सट्ट्याचे साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अरूण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोड येथे कारवाई
दरम्यान, वाघोड येथील बसस्टँडवरून नगीनदास कडू महाजन यांच्या जवळ सट्ट्याचे साहित्य व चिठ्ठ््या तथा २ हजार ५३० रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांच्यासह मालक शाहीद यांच्याविरूद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अरूण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, रावेर पोलिसांनी शहरातील शेख जाकीर शेख शब्बीर (वय ४०) रा इमामवाडा रावेर याच्याकडून सट्टाबेटींगचे साहित्य व ७१० रोख रक्कम जप्त करण्यात आली. पो. कॉ. सुरेश मेढे यांचे फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच वाघोड येथील मगन महाजन यांच्या हॉटेलसमोर एका टपरीवर ७५० किमतीच्या देशी दारूच्या १५ बाटल्या अवैधरीत्या विक्रीसाठी बाळगताना आढळून आल्या. पो.का.ॅनीलेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ravi taluka raid on three sites in three places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.