रावेरची जागा काँग्रेसला, डॉ. उल्हास पाटील प्रबळ दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:01 IST2019-03-29T23:01:04+5:302019-03-29T23:01:20+5:30
तिढा अखेर सुटला

रावेरची जागा काँग्रेसला, डॉ. उल्हास पाटील प्रबळ दावेदार
जळगाव: रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर शुक्रवारी २९ रोजी सुटला आहे. ही जागा कॉँग्रेसला गेली असून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील हे या ठिकाणच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. उमेदवारीसंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांचा संदेश डॉ. पाटील यांना प्राप्त झाला असल्याचे त्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. दरम्यान या ठिकाणी भाजपाकडून विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.