शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

रावेर शिक्षण संवर्धक संघाची निवडणूक ५ एप्रिलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:44 IST

रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या संस्था कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळो अथवा ना मिळो ५ एप्रिल रोजी घेण्याचा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला.

ठळक मुद्दे सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव संमतताळेबंद तथा लेखापरीक्षण अहवालाला या सर्वसाधारण सभेत मंजुरी

रावेर, जि.जळगाव : येथील रावेरशिक्षण संवर्धक संघाच्या संस्था कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडणूक ही संस्थेच्या घटना दुरुस्तीला मंजुरी मिळो अथवा ना मिळो ५ एप्रिल रोजी घेण्याचा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ.वि.रावेरकर होते.प्रारंभी, संस्थेचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी सादर केलेल्या संस्थेच्या संचलित सरदार जी.जी.प्राथमिक शाळा, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तथा कमलाबाई एस.अग्रवाल प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय अहवाल, जमा-खर्च व आर्थिक तेरीज ताळेबंद तथा लेखापरीक्षण अहवालाला या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली.दरम्यान, संस्थेच्या सचिवपदी सेवाज्येष्ठतेनुसार निवड झालेल्या जयंत कुलकर्णी यांच्या निवडीला मंजुरी देण्यात आली.कार्यकारिणी मंडळाने शिफारस केलेल्या पेट्रन सभासदांना मंजुरी देण्याचा विषय उपस्थित झाल्यानंतर माजी संस्थाध्यक्ष वासुदेव महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन व हरीश गणवानी, एम.कुमार पाटील यांनी आपण संस्थेची सर्वसाधारण सभा व कार्यकारिणी निवड नियमितपणे न घेता बेकायदेशीरपणे कार्यकाळ कसा वाढवला, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर संस्थाध्यक्ष रावेरकर यांनी गत दोन वर्षांपासून निवड झालेल्या १३० पेट्रन सभासदांना ५ वर्षाऐवजी एक वर्षाने निवडणूक लढविण्याचा हक्क बजावण्याचा अधिकार अदा करण्याचा घटना दुरूस्तीचा अहवालास धर्मदाय आयुक्त कार्यालयाची मंजुरी नसल्याने व संस्थेच्या उन्नतीसाठी हाती घेण्यात आलेले कामे पूर्णत्वास न आल्याने या सर्वसाधारण सभेस विलंब झाल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करण्यात आली.दरम्यान, आज पुन्हा १० पेट्रन सभासदांना मंजुरी देण्याच्या कार्यकारी मंडळाचे शिफारसीला मंजुरी देण्यात आली. मात्र, मयत आजीवन सभासदांशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या चार ते पाच सदस्यांची देणगी का स्विकारण्यात आली, असा आक्षेप विरोधकांनी घेतला असता, ती देणगी सभासदत्वाची नसली तरी ती साभार परत करण्यात यावा असा ठराव सर्वानुुमते मंजूर करण्यात आला.दरम्यान, विषय क्रमांक ७ प्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची तारीख ठरवण्याचा विषय समोर आला असता माजी संस्थाध्यक्ष वासुदेव महाजन, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन व हरीश गणवानी,गोपाळ पाटील व एम.कुमार पाटील यांनी सदरची निवडणूक शक्य तितक्या लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर, डॉ.राजेंद्र आठवले, मनीष वाणी, तुषार मानकर, शैलेंद्र अग्रवाल आदींनी नवीन सभासदांना निवडणूक लढविण्याचा हक्क एक वर्षांनंंतर प्राप्त होण्यासाठी प्रस्तावित केलेल्या घटनादुरुस्तीला मंजूरी मिळाल्यानंतरचं सदरची निवडणूक घेण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यावर समन्वय साधून प्रा.प्रकाश मुजूमदार यांनी फेब्रुवारी व मार्च महिन्यात नाशिक विभागीय दहावी व बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा असल्याने दरम्यानच्या काळात घटना दुरुस्तीसाठी प्रयत्न करता येतील. म्हणून दि.५ एप्रिल रोजी संस्था कार्यकारिणी निवडणूक घेण्याचा निर्णय सवार्नुमते मंजूर करण्यात आला.या सर्वसाधारण सभेत माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, हरीश गणवानी, माजी संस्थाध्यक्ष वासुदेव महाजन, गोपाळ पाटील, एम.कुमार पाटील, माजी उपनगराध्यक्ष अशोक वाणी, प्रमोद वाणी, डॉ.राजेंद्र आठवले, तुषार मानकर, शीतल वाणी, सतीश वाणी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. व्यासपीठावर चेअरमन प्रा.प्रकाश मुजूमदार, संचालक कन्हैयालाल अग्रवाल, डॉ.पी.टी. पाटील, प्रभाकर महाजन, राजेंद्र अग्रवाल,पांडुरंग पाटील, जगन्नाथ चौधरी, दिनकर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणRaverरावेर