शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार न मिळाल्यानेच ‘रावेर’ काँग्रेसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:20 IST

राष्ट्रवादीकडून अखेर तडजोड : डॉ. उल्हास पाटील यांचे नाव आघाडीवर

जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर शुक्रवार, २९ मार्च रोजी सुटला. ही जागा कॉँग्रेसला सोडण्यात आली आहे. मात्र उमेदवाराची घोषणा शनिवार, ३० मार्चपर्यंत वरिष्ठांकडून होईल, अशी माहिती काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील यांनी शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. राष्टÑवादीला उमेदवार न मिळाल्याने व बाहेरून तगडा उमेदवार आयात करण्यातही अपयश आल्यानेच राष्टÑवादीने ही तडजोड केल्याचे मानले जात आहे.काँग्रेसकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे नाव या जागेसाठी आघाडीवर आहे. काँग्रेसने नाव निश्चित केल्याच्या वृत्तास स्वत: डॉ. उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला असून अधिकृत घोषणा श्रेष्ठीच करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.दबावतंत्राचा वापर ठरला यशस्वीरावेरच्या जागेची सातत्याने मागणी करुही न मिळाल्याने काँग्रेसने दबावतंत्राचाही उपयोग केला. त्याचाही फायदा झाला.पाच इच्छुकांचे होते अर्जअ‍ॅड. संदीप पाटील यांनी रावेरसाठी उमेदवाराची घोषणा शनिवारी  वरिष्ठांकडून होईल,असे स्पष्ट केले. या जागेसाठी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार निळकंठ फालक (भुसावळ), डॉ.जगदीश पाटील (मुक्ताईनगर), अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुजावर शेख (भुसावळ), प्रा.हेमंत चौधरी यांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केले असल्याची माहितीही जिल्हाध्यक्षांनी दिली.मुख्य प्रचार कार्यालय जळगावातचरावेर मतदार संघाची निवडणूक आम्ही लढवणार असलो तरी जळगाव येथील कॉग्रेस भवन हेच मुख्य प्रचार कार्यालय राहील असे डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. पत्रपरिषदेस प्रदेश चिटणीस डी.जी. पाटील, महानगर अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, सरचिटणीस अजबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, अ‍ॅड. अविनाश भालेराव, उल्हास साबळे आदींची उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्षांकडून हिरवा कंदील- डॉ. उल्हास पाटीलरावेरच्या जागेवर आपली उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांनी दूरध्वनीवरुन आपणास दिली असल्याची माहिती डॉ. उल्हास पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.१२ वर्षानंतर जागा मिळालीही जागा मूळ काँग्रेसचीच असून गेली पोटनिवडणूक व दोन टर्म साठी (१२ वर्ष) या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिला. परंतु दोन्ही वेळेस त्यांना यश आले नाही. यामुळे काँग्रेसने या ठिकाणी दावा केला व पाठपुरावाही केला.

टॅग्स :raver-pcरावेरPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक