रावेर मतदार संघातून डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 15:11 IST2019-03-29T15:02:04+5:302019-03-29T15:11:41+5:30
आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर शुक्रवारी २९ रोजी सुटला

रावेर मतदार संघातून डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी
जळगाव: रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर शुक्रवारी २९ रोजी सुटला आहे. ही जागा कॉँग्रेसला गेली असून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोक चव्हाण यांचा संदेश डॉ. पाटील यांना प्राप्त झाला असल्याचे त्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. दरम्यान या ठिकाणी भाजपाकडून विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे.