रावण, दुर्योधन, नरकासुराचे गर्व हरण झाले, यांचा काय राहील; गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका
By विलास.बारी | Updated: September 20, 2022 23:59 IST2022-09-20T23:58:56+5:302022-09-20T23:59:54+5:30
आता आपले दिवस, त्यांची दादागिरी संपली.

रावण, दुर्योधन, नरकासुराचे गर्व हरण झाले, यांचा काय राहील; गिरीश महाजनांची खडसेंवर जहरी टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील आपल्या भाषणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली.
मुक्ताईनगरातील नेत्यांना मोठा गर्व असल्याचे सांगत, हा गर्व कधीही टीकत नसतो. रावण, दुर्योधन, नरकासूर यांचा गर्व टीकला नाही तर यांचा काय टीकेल अशा शब्दात महाजनांनी खडसेंवर टीकास्त्र सोडले. तसेच चंद्रकांत पाटील यांनी न घाबरता काम करण्याची गरज असून, आता राज्यात आपले सरकार आहे. आपली वेळ आली असल्याचे सांगत आता कोणाची दादागिरी चालणार नाही असे सांगत खडसेंना टोला लगावला.
हा ‘एकनाथ’ हात देणारा, तो ‘एकनाथ’ हात धुऊन मागे लागणारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना सांगितले की, मुक्ताईनगरातील एक एकनाथ तुमच्या मागे हात धुऊन लागला. मात्र, हा एकनाथ तुमचा हात धरुन तुमच्या पाठीशी भक्कम उभा राहिल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. आता आपले सरकार आले असून, शिवसैनिकांना घाबरण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.