Ratnagiri returned from Delhi to police custody | दिल्लीहून परतणारे रत्नागिरीचे दोघे पोलिसांच्या ताब्यात

दिल्लीहून परतणारे रत्नागिरीचे दोघे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : दिल्ली येथील कार्यक्रमाहून परतून जळगावात पिंप्राळा परिसरात एका खोलीत वास्तव्यास असलेल्या रत्नागिरी येथील दोघांना रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. दोघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मूळ रत्नागिरी येथील रहिवासी दोन जण दिल्ली येथील निजामुद्दीन येथे कार्यक्रमाला गेले होते. तेथून दोघेही काही दिवसांपूर्वी जळगावात परतले. यानंतर दोघेही जळगाव शहरातील प्रिंपाळा परिसरातील एका खोलीत राहत होते.
दोघांनी दिल्ली येथून परतल्याच्या माहितीसह स्वत:ची ओळख लपविली. या दोघांबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना गोपनीय माहिती मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी याची दखल घेतली. यानंतर सतीश डोलारे, अनिल फेगडे, राकेंश दुसाने या कर्मचाऱ्यांसह पिंप्राळा परिसरात संबंधित दोघांचा शोध घेतला. दोघांना पोलीस वाहनातून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले.
रत्नागिरी येथील दोन जण दिल्ली येथील कार्यक्रमाहून परतल्यानंतर पिंप्राळा परिसरात वास्तव्यास होते. दोघांबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानुसार दोघांना कोरोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
- अनिल बडगुजर, पोलीस निरिक्षक ं

Web Title: Ratnagiri returned from Delhi to police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.