शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

सातपुड्यात आढळली दुर्मिळ जाथारी किटकभक्षी वनस्पती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:31 PM

जळगावच्या डॉ.तन्वीर खान यांना यश

ठळक मुद्देदेशभरात केवळ ३५ प्रजाती असल्याचा दावा‘इंडियन फॉरेस्टर’ साठी शोध निबंध पाठविला

अजय पाटीलजळगाव - खान्देशातील सातपुडा पर्वतरांग ही जैवविविधतेने नटलेली आहे. या पर्वतरांगेत आतापर्यंत अनेक दुर्मिळ वनस्पती आढळून आल्या आहेत. एच.जे.थीम महाविद्यालयातील प्राध्यापक, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान यांनी नुकतीच जाथारी नामक दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती नंदुरबार जिल्ह्णातील तोरणमाळ तसेच डाब या भागात आढळून आली आहे.जाथीरा ही अत्यंत दुर्मिळ किटकभक्षी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ‘युट्रीक्युलाररीया जनार्थनामी’ असे आहे. डॉ.तन्वीर खान यांनी सांगितले की, भारतात या वनस्पतीच्या केवळ ३५ प्रजाती आहेत. त्या देखील आता नष्ट होण्याचा मार्गावर आहेत. ३५पैकी २२ प्रजाती या महाराष्टÑात आढळून येतात. कासच्या पठारावर सर्वाधिक नोंद होते. सातपुड्यात या वनस्पतीचा आतापर्यंत शोध घेण्यात आलेला नव्हता. पुणे विद्यापीठाचे डॉ.मिलिंद सरदेसाई यांनी या प्रजातीची सर्व प्रथम नोंद २००० मध्ये पश्चिम घाटात केली होती. डॉ.तन्वीर खान हे सातपुड्यात अभ्यासासाठी गेले असता त्यांना ही वनस्पती आढळून आली.‘इंडियन फॉरेस्टर’ साठी शोध निबंध पाठविलाडॉ.खान यांनी डॉ. सरदेसाई यांच्याकडून या वनस्पतीची खात्री करून घेतली. त्यानंतर डॉ.खान यांनी या वनस्पतीवर तयार केलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्टर’ या विज्ञान पत्रिकेला पाठविला आहे. यासाठी डॉ.विनोद कुमार गोसावी व अजहर शेख यांचे सहकार्य डॉ.खान यांना लाभले.काय आहे, या वनस्पतीचे वैशिष्ट्य?जाथीरा या वनस्पतीला आकर्षक निळे फुल असते. या वनस्पतीच्या तळाशी एक पिशवी असते. किटकांना त्यामध्ये भक्ष करून या वनस्पतीची वाढ होत असते. पर्वत उताराच्या पानथळ जागा तसेच पर्वतांवरील पाणी साचलेल्या जागेवर ही वनस्पती आढळून येते. डॉ.तन्वीर खान यांनी आतापर्यंत सातपुड्यातील अनेक दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेतला आहे. तसेच नामशेष होत जाणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी ते अनेक वर्षांपासून काम करीत आहेत.जाथीरा या वनस्पतीसह सातपुड्यातील इतर दुर्मिळ वनस्पतीच्या संवर्धनासाठी जंगलांवर प्रेम करणाºया नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. वनस्पतींचे अस्तित्व कायम राहण्यासाठी प्रशासनाकडून विशेष संवर्धन मोहीम राबविण्याची गरज आहे.-डॉ.तन्वीर खान, वनस्पती अभ्यासक

टॅग्स :forestजंगलJalgaonजळगाव