शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

महाराष्ट्रात प्रथमच दुर्मीळ फायकस लेकॉर वनस्पतीची नोंद, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान व रेवन चौधरी यांचे यश

By ajay.patil | Updated: July 18, 2023 14:37 IST

Jalgaon: जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या सातपुड्यात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फायकस लेकॉर’ या दुर्मीळ वनस्पतीची नोंद करण्यात आली

- अजय पाटील

जळगाव - जिल्ह्याला लागून असलेल्या सातपुड्यात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फायकस लेकॉर’ या दुर्मीळ वनस्पतीची नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रात फायकस लेकॉर या वनस्पतीची प्रथमच नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. जळगावातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान व त्यांचे सहकारी रेवन चौधरी यांनी ही नोंद केली आहे.

सातपुड्यात आतापर्यंत संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात देखील अंत्यंत दुर्मीळ असलेल्या अनेक  वन्सपतींची नोंद वनस्पती अभ्यासकांकडून करण्यात आली आहे. त्यात आता ‘फायकस लेकॉर’ या वनस्पतीची भर पडली आहे. फायकस या वनस्पतीच्या भारतात एकूण ११५ प्रजाती आहेत. त्यात महाराष्ट्रात २२ प्रजाती आढळून येतात. त्यात आता फायकस लेकॉर या वनस्पतीची भर पडली आहे. या वनस्पतीच्या पृष्ठीकरणासाठी डॉ.खान व चौधरी यांनी भोपाल येथील वनस्पती अभ्यासक डॉ.पी.सी.दुबे व आंध्र प्रदेशातील डॉ.सुधाकर यांना पाठविले असता, त्यांनीही या नोंदीला दुजोरा दिला आहे. तसेच डॉ.तन्वीर खान यांनी लिहीलेला शोधनिबंध ‘इंडियन फॉरेस्ट’ या विज्ञान पत्रिकेत प्रकाशीत झाला आहे. यासाठी त्यांना मुजफ्फर शेख, उमेश पाटील, अजहर शेख यांचे सहकार्य लाभले.

वनस्पतीचे काय आहे वैशिष्टफायकस लेकॉर असे शास्त्रीय नाव असलेल्या वनस्पतीला अंजीर सारखे केसाळ फळे येतात. या वनस्पती ची लांबी १० मीटरपर्यंत लांब असते. झाडाच्या फांद्याही केसाळ असतात. फांद्यांवर फळांचे गुच्छे असतात. वडाप्रमाणे यांना पारंब्या नसतात. पर्वत उतार व पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी या ही वनस्पती आढळून येते.

सातपुडा पर्वतरांग ही दुर्मीळ वनस्पतींचा खजिना आहे. काळानुरूप इथे नवनवीन दुर्मीळ वनस्पतींचा व प्राण्यांचा शोख लागत आहे. यामुळे जैवविविधतेचा बाबतीत सातपुडा पर्वताचे महत्व देशात वाढत जात आहे. अशा या अनमोल खजिन्याचे संवर्धन करण्यासाठी प्रशासनाबरोबर सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.-डॉ.तन्वीर खान(एच.जे.थीम, महाविद्यालय, जळगाव)

टॅग्स :JalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्रforestजंगल