शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार, तरुणाला मरेपर्यंत जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 19:00 IST

तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार; जळगाव न्यायालयाचा निकाल :

ठळक मुद्देया घटनेबाबत माहिती अशी की, २६ मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजता पीडित बालिका गल्लीत खेळत होती तर तिची आई घरात काम करीत होती. त्यावेळी किशोर भोई याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला.

जळगाव : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तीन वर्षाच्या मुलीवर लैगिक अत्याचार करणाऱ्या किशोर उर्फ पिंटू निंबा भोई (वय ३८,रा. बेडरपुरा, नगरदेवळा, ता.पाचोरा) याला सत्र न्यायालयाने बुधवारी मरेपर्यंत जन्मठेप व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.

या घटनेबाबत माहिती अशी की, २६ मार्च २०१९ रोजी दुपारी दोन वाजता पीडित बालिका गल्लीत खेळत होती तर तिची आई घरात काम करीत होती. त्यावेळी किशोर भोई याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पीडितेला घरात बोलावून अत्याचार केला. याचवेळी पीडितेचा रडण्याचा आवाज आल्याने तिची आई धावून आली असता किशोर याच्या घराचा दरवाजा बंद होता. आवाज देऊनही तो दरवाजा उघडत नव्हता. आजुबाजुच्या लोकांनी धाव घेऊन आवाज दिला असता त्याने अर्धनग्न अवस्थेत दरवाजा उघडून तेथून पळ काढला. पीडित बालिकेने आईजवळ घटनाक्रम कथन केला. त्यानंतर आईने त्याच स्थितीत पाचोरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरुन कलम ३५४ अ व ३७६ तसेच बाललैगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम १२ चे कलम ३,४,५ एम ६,७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेची साक्ष ठरली महत्वपूर्णहा खटला सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी वकील यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्यानंतर ३ वर्ष वयाच्या चिमुरडीसोबत झालेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे असेच आहे, त्यामुळे समाजातील अशा प्रवृत्ती ठेचण्यासाठी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असा प्रभावी युक्तीवाद करुन काही पुरावे न्यायालयासमोर सादर केले. यात पीडितेची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. त्यामुळे न्यायालयाने ३७६ अ व ३७६ ब अन्वये किशोर भोई याला दोषी धरुन मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी देविदास कोळी यांची या खटल्यात मोलाची मदत झाली. 

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी