प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:17+5:302021-03-04T04:28:17+5:30

प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल जळगाव : लग्नाआधी व लग्नानंतरही प्रेमसंबंध प्रस्थापित करून प्रियकराने वेळोवेळी जळगाव शहर व पिंप्री, ता. धरणगाव ...

Rape of a married woman through a love affair | प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार

प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार

प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : लग्नाआधी व लग्नानंतरही प्रेमसंबंध प्रस्थापित करून प्रियकराने वेळोवेळी जळगाव शहर व पिंप्री, ता. धरणगाव येथे बलात्कार केल्याची तक्रार प्रेयसीने दिली आहे. त्यावरून किशोर कांबळे (रा. के.सी. पार्क) याच्याविरुद्ध मंगळवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहिता व कांबळे यांचे पीडितेच्या लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतर पीडिता पिंप्री येथे वास्तव्यास असताना पती घरी नसल्याच्या वेळी किशोर तिच्याकडे जाऊन जबरदस्तीने अत्याचार करायचा. आता जळगाव शहरात वास्तव्यास असतानाही त्याच्याकडून हा प्रकार सुरूच होता. सोमवारी दुपारीदेखील जबरदस्तीने घरी येऊन अत्याचार केला. त्या वेळी पती घरी आले असता त्यांनाही धमकी दिली तसेच मुलांना ठार मारण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Rape of a married woman through a love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.