विवाहितेवर बलात्कार, आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST2021-07-20T04:13:42+5:302021-07-20T04:13:42+5:30

पीडित महिला विवाहापूर्वी माहेरी रहात असताना बाहेरपुरा भागातील रहिवासी रहीम लाला शेख याच्याशी पीडितेचे प्रेमसंबंध अहोते. पीडितेशी रहीमचे ...

Rape of married woman, accused arrested | विवाहितेवर बलात्कार, आरोपीस अटक

विवाहितेवर बलात्कार, आरोपीस अटक

पीडित महिला विवाहापूर्वी माहेरी रहात असताना बाहेरपुरा भागातील रहिवासी रहीम लाला शेख याच्याशी पीडितेचे प्रेमसंबंध अहोते. पीडितेशी रहीमचे शारीरिक संबंध होते. पीडितेचा विवाह झाल्यानंतर तिला ३ मुली झाल्या. मात्र मागील शारीरिक संबंधाची पतीला व सासरच्यांना सांगण्याची धमकी देत रहिमने पीडितेवर ५ महिन्यापूर्वी नदीच्या कडेला संध्याकाळी बलात्कार केला व अडीच महिन्यांपूर्वी सकाळी ८च्या सुमारास रस्त्यात गाठून बळजबरीने दुचाकीवर बसवून (फरदापूर, सोयगाव) येथील लॉजवर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास तुला चाकूने मारून टाकीन व तुझ्या पतीलाही जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.

दि. १७ रोजीदेखील रहीम याने पीडितेला गाठून शारीरिक संबंधाची मागणी केली, अन्यथा तुझी समाजात बदनामी करून पूर्वीचे प्रकार सासरच्यांना सांगेन, अशी धमकी दिली. या प्रकाराला वैतागून पीडितेने पतीस सर्व हकिकत सांगितली. यावरून पाचोरा पोलिसात पीडितेने फिर्याद दिली असता आरोपी रहीम यास अटक करण्यात आली आहे. पाचोरा पोलिसात उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Rape of married woman, accused arrested